breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे, बारामतीत 23 तर शिरूर, मावळमध्ये 29 एप्रिलला

पुणे – पुणे जिल्ह्यातील एकूण चार लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिलला तर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी दिली.

जिल्ह्यातील निवडणुकीच्या तयारीबरोबरच आचारसंहितेच्या अंमलबजावणीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी राम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग उपस्थित होते.

राम म्हणाले, ‘जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय तीन भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तर 31 तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. याशिवाय व्हिडीओ चित्रीकरण टिम स्वतंत्रपणे राहणार आहे. जिल्ह्यात एकूण 7 हजार 666 मतदान केंद्रे आहेत. त्याचबरोबर निवडणुकीसाठी 24 निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.” पोलिस खात्याकडून निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती पाटील यांनी या वेळी दिली.

मतदारांमध्ये वाढ
पुणे लोकसभा मतदारसंघात 20 लाख 24 हजार 731 मतदार आहेत. बारामती मतदारसंघात 20 लाख 77 हजार 278, मावळमध्ये 22 लाख 27 हजार 133 आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 21 लाख 11 हजार 465 मतदार आहेत. जिल्ह्यातील मतदारांची संख्या 2014 मध्ये 63 लाख 48 हजार 704 होती. त्यामध्ये सुमारे दहा लाखांनी वाढ होऊन ती 73 लाख 63 हजार 812 एवढी झाली असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button