breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

उद्धव ठाकरेंकडून लोकसभा मतदार संघावरुन रामदास आठवलेंची कोंडी

मुंबई – दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून पुन्हा राहुल शेवाळे यांनाच उमेदवारी देण्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुतोवाच करत रिपाइं नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची कोंडी केली. आज ‘मातोश्री’वर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचा डिजिटल कार्यअहवाल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

या वेळी त्यांनी शेवाळे यांनाच दक्षिण मध्य मुंबईची उमेदवारी देण्याबाबत संकेत दिले. दक्षिण मध्य मुंबईतून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे इच्छुक होते; मात्र ठाकरे यांच्या या घोषणेमुळे आठवलेंची कोंडी झाली आहे. दरम्यान, आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईशान्य मुंबईतील जागेची मागणी केली आहे. ‘आमच्या पक्षाला शिवसेना आणि भाजपने दोन जागा द्याव्यात. केंद्रात आणि राज्यात दोन मंत्रिपदे द्यावीत. युतीमधले घटकपक्ष हे केवळ त्याग करण्यासाठी नाहीत,’ असा इशाराही आठवलेंनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button