breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे पदवीधर- शिक्षक मतदार संघ निवडणूक : पिंपरी-चिंचवड भाजपाचा बुधवारी चिंचवडमध्ये मेळावा

पिंपरी । प्रतिनिधी

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे पिंपरीचिंचवड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी चिंचवड येथील  प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सकाळी १० वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्‍यात आला आहे.

पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख व पुणे शिक्षक मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार व शहरातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सभागृह नेते नामेदव ढाके यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button