breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

Corona Vaccine; करोनाची लस घेतल्यानंतर दोन महिने मद्यप्राशन बंद ठेवण्याच्या सूचना

कोरोना महामारीमुऴे जगभर सर्वच देशांना मोठा फटका बसला आहे. लवकरात लवकर कोरोनावर लस शोधण्याठी जगभरातील प्रयोगशाळा आणि विद्यापिठांमध्ये संशोधन सुरु आहे.

मात्र ब्रिटेनने कोरोनाच्या लसीकरणाला मंजूर देऊन त्याचे लसीकरण सुरूही केले आहे. युनायटेड किंग्डम, रशिया आणि चीनसारख्या देशांनी आपआपल्या देशातील नागरिकांना करोनाची लस देण्यासंदर्भातील मोहिम सुरु केली आहे. मात्र ही लस घेतल्यानंतरी सर्व काही सुरळीत झाले असा गैरसमज करूऩ घेण्याची घाई करू नये.

रशियाच्या उप-पंतप्रधान टाटियाना गोलिकोवा यांनी करोना लसीसंदर्भातील सूचना आणि नियमांची घोषणा केली आहे.

रशियाची स्पुटनिक व्ही ही कोविड-१९ ला प्रतिबंध करणारी लस देण्याआधीच रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी या लसीसंदर्भात नागरिकांना काही सूचना दिल्या आहेत.

काय आहेत सूचना

  • रशियन वृत्तसंस्था टास (टीएएसएस) ने दिलेल्या माहितीनुसार, रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पुटनिक व्ही लस घेतल्यानंतर नागरिकांना किमान दोन महिने मद्यप्राशन करता येणार नाही असं सांगितलं आहे. 
  • करोनाची लस दिल्यानंतर शरीरामध्ये तिचा परिणाम दिसून येईपर्यंत नागरिकांना काही गोष्टींची काळजी घेणं बंधनकारक असणार आहे.
  • करोनाची लस दिल्यानंतर ती शरीरामध्ये सक्रीय होऊन परिणाम दाखवण्यास किमान ४२ दिवसांचा अवधी लागू शकतो असं सांगण्यात आलं आहे.
  • लसीकरणानंतर रशियन नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे.
  • मास्क घालणं, सॅनिटायझर वापरणं, किमान लोकांना भेटणं.
  • मद्य सेवन टाळणं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधं घेणं हे सारं करावं लागणार आहे. 

गामालय सेंटरने विकसित केलेली स्पुटनिक व्ही या लसीला ऑगस्ट महिन्यात रशियन सरकारने मान्यता दिली होती.

मान्यता मिळाल्यापासून आतापर्यंत एक लाखांहून अधिक हाय रिस्क म्हणजेच अधिक धोका असणाऱ्या करोनाच्या रुग्णांना स्पुटनिक व्ही ही लस देण्यात आली असल्याचे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी संयुक्त राष्ट्रांसमोर दिलेल्या प्रेझेन्टेशनमध्ये सांगितलं होतं.

रशियामध्ये डॉक्टर तसेच शिक्षकांना आधी लस देण्यासंदर्भात योजना आखली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक व्ही लस ९२ टक्के परिणामकारक ठरली असल्याचे देशाच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले होते. 

अवश्य वाचाः जगताप समर्थकांचा आडमुठेपणा; महापालिकेत राष्ट्रवादी, शिवसेना अन् लांडगे समर्थकांची ‘युती’?

अवश्य वाचाः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक EDच्या कार्यालयात दाखल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button