breaking-newsपुणे

सेन्सॉर बोर्डाच्या दुर्मीळ नोंदी अभ्यासकांसाठी खुल्या

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संकेतस्थळावर २५०० पृष्ठे उपलब्ध

डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशनने १९२४ मध्ये ‘पूना रेडेड’ या मूकपटाची निर्मिती केली होती, नाटककार मामा वरेरकर त्याचे दिग्दर्शक होते. या मूकपटातील प्रसंग भारतीय स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर साम्राज्यशाहीविरुद्धातील हे रूपक असल्याचे मानून बॉम्बे बोर्ड ऑफ सेन्सॉरने हा प्रसंग वगळून १५ ऑगस्ट १९२४ ला डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशनला सेन्सॉरचे प्रमाणपत्र दिले होते. या आणि अशा अनेक रंजक नोंदींचा खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने (एनएफएआय) चित्रपट अभ्यासक आणि संशोधकांसाठी खुला केला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या अशा जवळपास २५०० पृष्ठांच्या नोंदी संग्रहालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

बॉम्बे आणि बंगाल सरकारच्या १९२० ते १९५० दरम्यानच्या राजपत्रामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपट सृष्टीशी संबंधित नोंदींचा उल्लेख देखील पाहायला मिळतो. जवळपास या २५०० पानांच्या नोंदींमध्ये चित्रपट तपासणी, रिळांची संख्या, कंपनीचे नाव, मूळचा देश, तपासणीसाठी आणि प्रमाणपत्र दिल्याची सर्टिफिकेट दिल्याची तारीख अशी माहिती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपट सृष्टीशी संबंधित अशा अनेक गोष्टींची माहिती या नोंदीमधून अभ्यासक आणि संशोधकांना उपलब्ध होणार आहे.

सिसिल बी डी मिले यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द व्होल्गा बोटमन’ या अमेरिकन मूकपटालाही सेन्सॉरने कात्री लावली होती. रशियातील बोल्शेविक क्रांतीशी संबंधित हा चित्रपट वर्णद्वेष, हिंसाचार, लालसा आण् क्रौर्याला खतपाणी घालणारा असल्याचे सांगत बॉम्बे बोर्ड ऑफ सेन्सॉरने या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता अशी रंजक माहिती या नोंदीमध्ये आहे, असे संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.

स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपट आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित या नोंदी म्हणजे एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपटांमध्ये रस असलेल्या जगभरातील चित्रपट संशोधकांसाठी ही माहिती मौल्यवान ठरेल.

– प्रकाश मगदूम, संचालक, एनएफएआय

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button