breaking-newsपुणे

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून राष्ट्रवादीच्या सारंग पाटील यांची माघार

पुणे – पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे पाचही जिल्ह्यातील इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

गेल्या निवडणुकीवेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात थोड्या मतांनी पराभूत झालेले सारंग पाटील यांनी यंदा पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी केली होती. पक्षातर्फेही यंदा पुन्हा त्यांना संधी दिली जाईल, असा कयास व्यक्त केला जात होता. मात्र त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील आगामी निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा करत त्याऐवजी सातारा लोकसभा मतदारसंघातील कामे करण्यासाठी पूर्ण वेळ देणार असल्याचे जाहीर केले. निवडणूक रिंगणातून पाटील यांनी माघार घेतल्याने पदवीधरच्या उमेदवारीसाठी बाशिंग बांधलेल्या इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. सारंग पाटील यांच्यासह अरुण लाड, माणिक पाटील चुयेकर, श्रीमंत कोकाटे, उमेश पाटील आदी नेत्यांची नावेही पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहेत. यापैकी अरुण लाड यांनी गेल्या वेळी पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यंदा त्यांनी पुन्हा एकदा पदवीधर मतदारसंघातून परिषदेवर जाण्यासाठी कंबर कसली आहे. आता पक्षाध्यक्ष कोणाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button