TOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे भोवले; आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

महापालिकेच्या अभियंता संघाचा निषेध

पुणे  : पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलेच भोवले आहे. महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर सोमवारी रात्री धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, संबंधित कार्यक्रमास कॉंग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करून आमदार धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धमकावले होते. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

दरम्यान, महापालिकेच्या अभियंता संघाने याप्रकरणी सोमवारी सभा घेत धंगेकर यांच्या कृतीचा निषेध नोंदविला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतुःशृंगी पोलिस ठाणे गाठून धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ आता आमदार धंगेकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button