breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य सरकारची मोठी कारवाई! राज्यातील १ लाख रेशन कार्ड रद्द होणार

मुंबई : रेशन कार्ड संदर्भात म्हणजेच शिधापत्रिका संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ‘एक घर, एक रेशनिंग कार्ड’ योजनेअंतर्गत डुप्लिकेट शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई केली जात आहे.

राज्यात मे महिना अखेर २ लाख ३२ हजार ७६६ रेशन कार्ड डुप्लिकेट आढळली आहेत. छाननीनंतर यातील १ लाख २७ हजार रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक २४ हजार ८२१ रेशनिंग कार्ड ही नागपूरमध्ये तर सर्वात कमी परभणी जिल्ह्यात ३८ इतकी आढळून आली.

हेही वाचा – Ashadhi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान

कोणत्या जिल्ह्यात किती आहेत डुप्लिकेट रेशन कार्ड

नागपूर२४,८२१
जळगाव९,८९७
कोल्हापूर८,३२२
पालघर८,०३२
ठाणे७,२६८
नांदेड६,५३५
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button