breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दिलासादायक! बारा दिवसात पाणीसाठा दुप्पट, मुंबईकरांना नऊ महिने पुरेल इतकं पाणी जमा…

मुंबई: मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झालेला आहे. सध्या मुंबईत अधूनमधून पाऊस पडत असला, तरी धरणक्षेत्रात मात्र चांगलाच पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या 12 दिवसात पाणीसाठ्यात दुप्पट वाढ झालेली आहे. 4 ऑगस्ट रोजी सातही धरणातील पाणीसाठा 5 लाख 5 हजार 896 दशलक्ष लिटर इतका होता. आज 16 ऑगस्टला धरणांमध्ये तब्बल 10 लाख 99 हजार 445 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा 75.96 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा पाणीसाठा पुढील नऊ महिने मुंबईकरांची तहान भागवेल इतका आहे.

मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी आणि विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासत असते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून दरदिवशी 3850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणी कपात करण्यात आली. परंतु, सध्या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

4 ऑगस्ट रोजी सातही धरणातील पाणीसाठा 5 लाख 5 हजार 896 दशलक्ष लिटर इतका होता. परंतु तलावांमध्ये पावसाची संततधार सुरु असल्याने सध्या म्हणजेच 16 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत सातही धरणांत 10 लाख 99 हजार 445 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झालेला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणं काठोकाठ भरायला सुमारे चार लाख दशलक्ष लिटर पाणी साठ्यात वाढ होण्याची गरज आहे. सात धरणांपैकी 27 जुलैला तुळशी तर 5 ऑगस्टला विहार तलाव ओव्हर फ्लो झालेला आहे. सध्या मुंबईत 20 टक्के पाणी कपात केलेली असली, तरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार देखील सुरुच आहे. जर धरण पूर्ण भरली तर मुंबईकरावरील 20 टक्के पाणी कपात बंद होऊ शकतेय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button