breaking-newsक्रिडा

पी व्ही सिंधू, साई प्रणितची उपांत्यपूर्व फेरीत धडक

भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि बी साई प्रणित या दोघांनी जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित सिंधूने सुमारे तासभर चाललेल्या सामन्यात जपानच्या आया ओहोरी हिला ११-२१, २१-१०, २१-१३ असे पराभूत केले. सिंधूला पहिला गेम गमवावा लागला पण त्यानंतर तिने दमदार कमबॅक केला व सामना जिंकला. दुसरीकडे साई प्रणितने ४५ मिनिटांच्या सामन्यात कांता त्सुनेयमा याला २१-१३, २१-१६ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

भारताच्या किदम्बी श्रीकांतला पहिल्याच फेरीत पराभूत करणाऱ्या एच. एस. प्रणॉयचा प्रवास दुसऱ्या फेरीत संपला. डेमार्कच्या रॅस्मस गेमके याने त्याला २१-९, २१-१५ असा पराभूत केला. त्याने पहिल्या फेरीत श्रीकांतला १३-२१, २१-११, २२-२० असे ३ गेममध्ये पराभूत केले होते. सामन्यातील पहिला गेम प्रणॉयने जिंकला होता. त्याने २१-१३ अशा मोठ्या फरकाने गेम खिशात घातला होता, पण नंतर प्रणॉयने दमदार पुनरागमन केले होते. त्याने दुसरा गेम २१-११ असा दणदणीत फरकाने जिंकला. तिसरा गेम चांगलाच रंगला. पण अखेर २२-२० अशा फरकाने प्रणॉयच सरस ठरला होता. दुसरीकडे डेन्मार्कच्या अँडर्स अँटोन्सन याने भारताच्या समीर वर्माला २१-१७, २१-१२ असे सरळ गेममध्ये पराभूत केले होते. पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि सुमित बी. रेड्डी जोडीचे आव्हान संपुष्टात आले. मलेशियाच्या गोह शे फेई आणि नूर इझुद्दीन जोडीने त्यांचा २१-१२, २१-१६ असा पराभव केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button