breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : पंजाबचा बंगळुरूवर दणदणीत विजय;के एल राहुलचे स्फोटक शतक

दुबई – आयपीएलच्या तेराव्या हंगामात गुरुवारी कर्णधार के एल राहुलच्या स्फोटक शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ९७ धावांनी दणाणून पराभव केला. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राहुलच्या खेळीच्या जोरावर पंजाबच्या संघाने ३ बाद २०६ धावसंख्या उभारली. मात्र बंगळुरुचा डाव १०९ धावात संपुष्ठात आला.

राहुलने १३२ धावांच्या वादळी खेळीत ७ षटकार आणि १४ चौकार लगावले. राहुलने त्याचे शतक षटकार खेचत पूर्ण केले. आयपीएलमध्ये राहुलचे हे दुसरे शतक ठरले. पंजाबकडून शतकी कामगिरी करणारा के एल राहुल सामनावीर ठरला.

दरम्यान, आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूने एका डावात सर्वाधिक १३२ धावा करण्याचा विक्रम राहुलने केला. यापूर्वी हा विक्रम रिषभ पंत याच्या नावावर होता. २०१८च्या मोसमात त्याने १२८ धावा केल्या होत्या. आयपीएलमधील एखाद्या संघाचा कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही राहुलने केला. तसेच राहुलने आयपीएलमधील ६०व्या सामन्यात २००० धावसंख्येचा टप्पा ओलांडला. सचिन तेंडूलकरने २ हजार धावा ६३ सामन्यांमध्ये केल्या होत्या. संपूर्ण आयपीएलचा विचार केल्यास ख्रिस गेलने ४८ सामन्यात तर शॉन मार्शने ५२ सामन्यात २ हजार धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे बुधवारी मुंबईने कोलकातावर विजय मिळवत अव्वल स्थान मिळवले होते. मात्र त्यानंतर पंजाबने बंगळुरूवर ९७ धावांनी विजय मिळवत चांगले रनरेट मिळवले. पंजाब आता गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. या संघाचे दोन सामन्यात दोन गुण झाले असून त्यांचा रनरेट + २.४५ इतका आहे. स्पर्धेत आतापर्यंत पंजाब, बेंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांचे प्रत्येकी दोन सामने झाले आहेत. या सर्व संघांनी एक सामन्यात विजय तर एक सामन्यात पराभव स्विकारला आहे. या सर्व संघांचे गुण दोन आहेत. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनीदेखील एक विजय मिळवत दोन गुण मिळवले आहेत. तर सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांनी पहिला सामना गमवल्यामुळे त्यांनी अजून गुणतक्त्यात खाते सुरू केले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button