breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पीजी इन्स्टिट्युट’च्या 53 डाॅक्टरांना पालिका सेवेत कायम करण्यास विरोध

  • राष्ट्रवादीच्या विरोधामुळे प्रस्ताव तहकूब करण्याची भाजपवर नामुष्की

पिंपरी, ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय (पी. जी. इन्स्टिट्यूट) सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी महापालिकेने मानधनावर भरलेल्या सुमारे 53 डॉक्टरांना महापालिका सेवेत कायम करून घेण्याच्या प्रस्तावावरून शुक्रवारी (दि. 22) सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. विरोधी पक्षाबरोबर सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनीही विरोध केल्याने मतदानासाठी घेतलेला हा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला. 

वायसीएम रुग्णालयातील या महाविद्यालयात भारतीय आर्युविज्ञान परिषदेने  येथे स्त्रीरोग व प्रसूती, अस्थिरोग, कान-नाक-घसा, पॅथॉलॉजी, बालरोग, भूलशास्त्र आणि मनोविकृती चिकित्सा या सात विषयांचा अभ्यासक्रम सुरू करण्यास नुकतीच मान्यता दिली. तसेच, परिषदेकडून 24 विद्यार्थ्यांचा प्रवेश देखील निश्चित झाला आहे. मात्र, हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी पालिकेने मानधनावर प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांपैकी काही कर्मचारी वर्ग भरेला आहे. मात्र, त्यापैकी प्राध्यापका असलेल्या डॉक्टरांना कायमस्वरुपी पालिका सेवेत घेण्यावरून हा सगळा वाद झाला.

सभेत कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांना सहशहर अभियंतेपदी बढती देण्याचा प्रस्ताव होता. त्यास प्रस्तावाला भाजपकडून या डॉक्टरांना कायम वेतनश्रेणीवर घेण्याची उपसूचना आयत्यावेळी मांडण्यात आली. त्यावर शिक्षक वर्गीकरणाप्रमाणे हा चुकीचा प्रस्ताव असल्याचे  सांगत तसे करता येणार नाही. दुजाभाव करू नका, नियमाने सागा, असे  मंगला कदम म्हणाल्या. सत्ताधारी भाजपच्याच आशा शेंडगे, संदीप वाघेरे यांनीही विरोध करत या उपसूचनेवर प्रश्न उपस्थित केले. दत्ता साने यांनी देखील याला विरोध करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.

दरम्यान, एकनाथ पवार यांनी वायसीएम आतापर्यंत काही लोकांचे दुकान होते. पण, तिथे सुधारणा होऊन रुग्णांना चांगले उपचार मिळणार आहेत. त्यातून काहींची दुकानदारी बंद होणार आहे. त्यामुळे या विषयाला विरोध होत  असल्याचे सांगत महापौरांना मतदान घेण्याची सूचना केली. महापौर जाधव यांनी मतदानाची सूचना नगरसचिवांना केली, परंतु सत्ताधारी नगरसेवकांनी अडविल्याने अखेर महापौरांनी हा प्रस्ताव तहकूब केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button