breaking-newsराष्ट्रिय

पिकनीकवरुन परतणारी शाळेची बस पलटली, 4 शिक्षकांसह 40 विद्यार्थी जखमी

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात एका शाळेच्या बसला भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातात 4 शिक्षकांसहीत 40 विद्यार्थी जखमी झालेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन दरभंगा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समस्तीपूर-खानपूर मार्गावर पिकनीकवरुन परतत असताना सकाळी हा अपघात झाला. राजगीर येथून ही बस खानपूरकडे येत होती. बसमध्ये पाच शिक्षक आणि 85 विद्यार्थी होते. बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे मोठ्या खड्यात ही बस पलटल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button