breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! सुरक्षा दल व पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, जवान व नागरिक जखमी

जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर परिसरात सुरक्षा दल आणि पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे. ही घटना श्रीनगरच्या हवल सजगीरपोरा परिसरात घडलेली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी झालेला आहे. पोलीस कर्मचारी आणि नागरिकाला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि पोलीस कर्मचारी यांच्या कुमकवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झालेले आहेत. सुरक्षा दलानं या परिसराला घेरलं असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षा दल आणि पोलीस यांना एकत्र दहशतवाद्यांनी यावेळी टार्गेट केलं आणि हल्ला केलेला आहे.

जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलमगिरी बाजार परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला करून लक्ष्य केले आहे. फारूख अहमद असं जखमी झालेल्या पोलीस जवानाचं नाव आहे तर दुसरा नागरिक असून दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन जारी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button