पिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

पिंपरी- राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनेच्या वतीने पिंपळे सौदागर येथील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींचा सत्कार कन्यारत्न या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे व त्यांच्या टीमच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी हुसेन मुलानी, कन्यारत्न चित्रपटाचे निर्माते डी. गोवर्धन, रोहन पाटील, कार्तिक दोलताडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात काजल लवटे (95%), भाग्यश्री शिंदे (94.20%), अनिष पोवार (93.80%), प्रतीक्षा खैरे (89%), गोविंद शिंदे (93.80%), वैभवी काटे (91.60%),संस्कृती काटे (91.60%), या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरविण्यात आले.

 

कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनेच्या पुणे अध्यक्षा मीना मोहिते यांनी केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button