पिंपरी / चिंचवड
उघड्या दरवाजावाटे दोन लॅपटॉप पळवले
पिंपरी l प्रतिनिधी
घराच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना 22 मे रोजी रात्री साडेनऊ ते साडेदहा वाजताच्या कालावधीत काटेपूरम चौक, पिंपळे गुरव येथे घडली.
गणेश नगीनदास पाटील (वय 30, रा. काटेपूरम चौक, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काटेपूरम चौकात राम पाटेकर यांच्या खोलीत भाड्याने राहतात. 22 मे रोजी रात्री साडेनऊ ते साडेदहा वाजताच्या कालावधीत त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यावाटे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. फिर्यादी यांच्या घरातून प्रत्येकी 25 हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरट्यांनी चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.