breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडी परिसरात धूर, औषध फवारणीला अखेर सुरुवात!

  • स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांच्या मागणीला यश
  • परिसरात घरोघरी तपासणी करण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा

पिंपरी | प्रतिनिधी
पावसाळ्यात डेंग्यू, कावीळ, अतिसार, मलेरिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. कुदळवाडी परिसरातदेखील मलेरियासह तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसू लागली. या आजारांना गांभीर्याने घेण्याची गरज असल्याची सक्त सूचना ‘फ’ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केल्यानंतर प्रशासनाने या भागात गुरुवारपासून धूर फवारणी व औषधफवारणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कुदळवाडी परिसरातही मलेरियासह तापाच्या पेशंटमध्ये लक्षणीय वाढ दिसू लागल्यानंतर स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांची भेट घेऊन याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. प्रभागात घाणीचे साम्राज्य आणि पाण्याच्या डबक्यांमुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया या संशयित रुग्णांंच्या संख्येत वाढ होत असल्याचेे निदर्शनास आणून दिल्यानंतर दाट लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी धुरीकरण करायला सुरुवात केली. तर पाण्याच्या साचलेल्या डबक्यांमध्ये, पावसाळ्यामुळे वाढलेल्या गवतावर औषध फवारणी देखील केली आहे.

प्रभागात धुरीकरण व औषध फवारणी करण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय तात्काळ जलद ताप सर्वेक्षणासाठी ‘टीम’ची नियुक्ती व तापाच्या पेशंटची नोंद घेण्यासाठी वैद्यकीय पथक नेमावे व नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी सूचना प्रशासनाला दिल्या आहे. तसेच, कुदळवाडी डेंग्यू ,मलेरिया,साचलेले पाणी याचे घरोघरी जाऊन तपासणी सुरू सर्व नागरिकांनी मनपा कर्मचारीना सहकार्य करावे.

दिनेश यादव, स्वीकृत सदस्य, फ प्रभाग.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button