breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपळे साैदागरच्या प्राईम प्लस सोसायटीत वृक्षारोपण

पिंपरी (पुणे) –  आपला परिसर स्वच्छ, सुदंर व हिरवा दिसावा हा उद्देश मनात ठेऊन पिंपळे सौदागर येथील प्राईम प्लस सोसायटीच्या वतीने सोसायटी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शितल काटे, चेअरमन पंकज भाकरे, संजय सावंत, आशिष पाटील, गोरडी दत्ता, अंजली भाकरे यांच्यासह जेष्ठनागरिक व बालगोपाळ उपस्थित होते.

यावेळी कडुलिंब, निलगिरी या देशी झाडांबरोबर हिरवा व पांढऱ्या रंगाचे विदेशी फायकस ही वृक्षही लावण्यात आली. सोसायटीच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून सोनचाफा, मोगरा या फुलझाडांचीही लागवड करण्यात आली. तर सभासदांनी टेरेस सजविण्याकरिता त्यांना गुलाब, तुळस रोपे वाटण्यात आली. ही वृक्ष लाऊन त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या वेळी उपस्थित नागरिकांच्या वतीने करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button