breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गायकांसाठी पिंपरी-चिंचवड आयडॉल स्पर्धेचे आयोजन

  • हर्षवर्धन भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
  • पिंपरी-चिंचवड, पुण्यातील कलाकारांसाठी सुवर्णसंधी

पिंपरी – लोकगीत, गजल, भावनीक गीते रोमँटीक सुरात गाऊन आपल्या मंजूळ आवाजाने रसिकांना मोहीत करून टाकणा-या नवोदीत गायकांसाठी पिंपरी-चिंचवड आयडॉल 2018 मोरया करंडक स्पर्धा भरविण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर यांनी शनिवारी (दि. 23) पत्रकार परिषदेत दिली.

कलाकारांसाठी भोईर यांच्या पुढाकाराने पीसीएमसी आयडॉल 2018 (मोरया करंडक) स्पर्धा भरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा केवळ पिंपरी-चिंचवडपुरती मर्यादीत नसून पुण्यातील कलाकारांनाही प्रवेश मिळणार आहे. विशेष म्हणजे दिव्यांग कलाकारांना विशेष संधी उपलब्ध असणार आहे. 15 ते 35 वयोगटातील गायकांना स्पर्धेत संधी मिळणार आहे. त्यासाठी गायकांना प्रवेशिका अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी चिंचवड येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या मनिषा स्मृती निवास (भोईरनगर, चिंचवड) याठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत प्रवेशिका उपलब्ध राहणार आहेत.

हर्षवर्धन भोईर म्हणाले की, स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. गेल्या चार वर्षात गायकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. काही कलाकारांनी इंडियाज गॉट टॅलेंट कार्यक्रमात बक्षिसे मिळविली. 2014 ची पहिली आयडॉल नुपुरा निफाडकर जगप्रसिध्द संगीतकार ए. आर. रेहमान यांच्याकडे प्रशिक्षण घेते. तर, 2015 चा आयडॉल कौस्तुभ दिवेकर मराठी चित्रपटात पार्श्वगायन करतो. स्पर्धेतील अनेक गायकांनी व्यावसायिक रंगमंचावर नाव कमावले आहे. नवीन गायकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यासाठी 5 जुलै अर्ज भरण्याची मुदत आहे.

पात्रता फेरी शनिवारी (दि. 7) आणि रविवारी (दि. 8) रोजी होणार आहे. पहिली फेरी शनिवारी (दि. 14) होईल. दुसरी फेरी शुक्रवारी (दि. 20) होईल. कार्यशाळा रविवारी (दि. 20) होईल. उपांत्य फेरी शुक्रवारी (दि. 27) तर, महाअंतिम फेरी शुक्रवारी (दि. 3 ऑगस्ट) रोजी होणार आहे. प्रत्येक फेरीचे तीन राऊंड होतील. स्पर्धेतून मोरया करंडक पीसीएमसी आयडॉल निवडला जाणार आहे. त्यासाठी 21 हजार रुपये बक्षिस राहणार आहे. तसेच, अंतिम निवडीतून टॉप टेन कलाकारांना प्रत्येकी दहा हजार रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. नाव नोंदणी करण्यासाठी 9822607687, 9822313066 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भोईर यांनी केले आहे.

स्पर्धेचे संयोजन मानसी भाऊसाहेब भोईर, सुषमा बो-हाडे यांनी केले. तर, संगीत संयोजन मधुमित निर्मित मधुसुदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा यांनी केले आहे. यावेळी विद्यमान नगरसेवक भोऊसाहेब भोईर, हर्षवर्धन भोईर, मानसी भोईर, सुषमा बो-हाडे उपस्थित होते.
———–

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button