breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी न्यायालयात 536 तर आकुर्डी न्यायालयात 21 खटले निकाली

पिंपरी – जिल्हा विधीसेवा प्राधिकरण पुणे व पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने  पिंपरी न्यायालयातील 536 तर आकुर्डी न्यायालयामधील 21 खटले आज निकाली काढण्यात आले.
पिंपरी येथील न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश मे. के. एम. पिंगळे व अन्य न्यायाधीश न्यायाधीश उपस्थित होते. आकुर्डी येथील न्यायालयात माधुरी खनवे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. सचिन पटवर्धन होते. तर नगरसेवक प्रवीण भालेकर,यावेळी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर, अॅड. अतिश लांडगे, अॅड. कालिदास इंगळे, अॅड. गणेश राऊत, अॅड. देवराव ढाळे, अॅड. गणेश शिंदे, अॅड. सुनील कड, अॅड. अतुल अडसरे, अॅड. योगेश थंबा आदी उपस्थित होते. उपस्थित होते.
यावेळी अॅड. सचिन पटवर्धन म्हणाले की, लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होऊन जास्तीत जास्त खटले निकाली काढण्याचे आव्हान केले, तर न्यायाधीश के. एम. पिंगळे यांनी लोकन्यायालयामार्फत खटले निकाली निघाल्यास कोर्टाचा भार कमी होतो तसेच पक्षकारांमधील सर्वांचा वेळ वाचतो.   नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी वकिलांना मार्गदर्शन केले.
पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर म्हणाले लोकन्यायालयामध्ये सहभागी झाल्यास त्यांचा खर्च वाचतो वेळ वाचतो तसेच आरोपीस देखील शिक्षा होत नाही व सर्वांमध्येच एकोपा राहतो.
या लोकन्यायालयामध्ये आकुर्डी न्यायालयामध्ये ्रप्रिलीटीगेशन म्हणजेच दाखलपूर्व 50 पैकी 22 खटले निकाली निघाले. या प्रिलीटिगेशन खटले एकूण 13,08,262  एवढ्या रकमेचे होते. तसेच पिंपरी न्यायालयामध्ये फौजदारी, दिवाणी व कलम 138 चे असे एकूण 794 पैकी 168 खटले निकाली निघाले. त्याची एकूण रक्कम 91,08,115 एवढी होती. तर प्रिलिटिगेशनचे 11,160 पैकी 368 खटले निकाली लागले. प्रिलिटिगेशन खटले एकूण 4,84,221 एवढ्या रकमेचे होते. हा आकडा विक्रमी असल्याचे अॅड. राजेश पुणेकर यांनी सांंगितले.
लोकन्यायलायचे परीक्षक म्हणून अॅड. शिवाजी महानदर, अॅड. रुपाली तोरखडे, अॅड, मोनिका गाढवे, अॅड. शुभांगी थोरात, अॅड. संकल्पा वाघमारे, अॅ़ड. जान्हवी पतके, अॅड. स्मिता रिठे, अॅड. केशव घोगरे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन अॅड. कांता गोरडे यांनी केले. प्रास्ताविक अॅड. तुकाराम पडवळे यांनी केले. अॅड. कालिदास इंगळे यांनी आभार मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button