breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना.. पिंपरी चिंचवड पालिकेची चोवीस तास सारथी हेल्पलाईन सुरु

बाधितांची नावे गोपनिय राहणार, नागरिकांनो घाबरुन न जाता वैयक्तीक काळजी घ्या

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात पाच संशयातापैकी तीन पुरुषांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्या रुग्णामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळलेली नाहीत. परंतू, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल, तसेच शहरातील नागरिकांनी घाबरुन जावू नये, तरीही प्रत्येकाने काळजी घ्यावी, कोरोना संदर्भात माहिती देण्यास पालिकेने सारथी हेल्पलाईन 8888006666 आणि राज्य सरकारच्या 104 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

पिंपरी चिंचवड शहरातील पाचपैकी दोघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याना घरी सोडले असून इतर तिघांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनाबाधितांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, त्यांच्या कुंटुबियांची माहिती प्रसारित करु नये, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

तसेच कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. वायसीएममध्ये दहा खाटांचा विलगीकरण कक्ष सज्ज केला आहे. तर, सात खासगी रुग्णालयात 60 आयसोलशन बेड उपलब्ध केले आहे. भोसरीतील रुग्णालयात 60 खाटांचे विलगीकरण कक्ष तयार केला जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु केली असून आज संध्याकाळपर्यंत 40 खाट तयार केले जातील. उर्वरित खाट उद्या केले जातील. याशिवाय पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात 60 खाट तयार आहेत. त्यातील 20 खाटांचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.

नागरिकांनो… वैयक्तिक स्वच्छता ठेवून काळजी घ्या..

नागरिकांनी घाबरुन न जाता वैयक्तीक काळजी घ्यावी. हस्तांदोलन टाळावे, खोकताना तोंडाला रुमाल धरावा. सर्दी, खोकल्याचे लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सुचनांनुसार तपासणी करुन घ्यावी, खोकला, सर्दी असल्यास घरात बंदिस्त रहावे. मास्क कोणी वापरायाचा हे वैद्यकीय विभागाने निश्चित केले आहे. त्यामुळे वैद्यकीय सल्यानुसारच मास्कचा वापर करावा. तंदुरुस्त असणा-यांनी मास्कचा वापर करणे टाळावे, असेही आयुक्त हर्डीकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button