breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या अधिका-यांचे पंख छाटले

223 अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश ;  चतुर्थ श्रेणींच्या बदल्या दुस-या टप्प्यात

पिंपरी – महापालिकेच्या एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या वरिष्ठ अधिका-यांसह कर्मचा-यांची उचलबागंडी करण्यात आल्या आहेत. पालिका प्रशासन विभागाने तीन ते सहा वर्षांहून अधिक कामकाज केलेल्यांना बदलण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेतील आठ कार्यकारी अभियंत्यासह वर्ग एक ते तीनच्या एकूण 223 अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या प्रशासन विभागाने आज (शुक्रवारी) आदेश काढले आहेत. मात्र, महापालिकेतील चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचा-यांच्या बदल्याही दुस-या टप्प्यात करण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन विभागाने धोरणानूसार तीन वर्षात टेबल व सहा वर्षात विभागाअंतर्गंत बदल्याचे राबविले आहे. महापालिका प्रशासन विभागाकडून एप्रिल महिन्यापासून सर्व विभागाकडून माहिती मागविण्यात आली होती. त्यानूसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रजेवर जाण्यापूर्वी बदल्यांच्या आदेशावर सह्या केल्याने प्रशासन विभागाने आदेश काढले आहेत.
महापालिकेच्या प्रथम वर्गातील आठ कार्यकारी अभियंत्यासारख्या अधिका-यांचा समावेश असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, श्रीकांत सवणे यांची स्थापत्य विभाग काढून बांधकाम परवाना विभाग देण्यात आला. तर, मनोज शेठीया, प्रशांत पाटील यांची बांधकाम परवाना विभागातून उचलबांगडी केली आहे. यामध्ये शेठीया यांना स्थापत्य आणि पाटील यांनी पाणीपुरवठा, ड्रेनेज विभाग देण्यात आला आहे. देवन्ना गट्टूवार यांची पाणीपुरवठा, ड्रेनेजमधून ड प्रभागात, तर प्रमोद ओंभासे यांची ड प्रभागातून स्थापत्य बीआरटीएसमध्ये बदली केली आहे.

स्थापत्य, बांधकाम परवानाबरोबर विद्यूत विभागातील कार्यकारी अभियंता बाबासाहेब गलबले व संदेश चव्हाण यांच्यात दोघांमध्ये विभागाअंतर्गंत अदलाबदली करण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिकेने अधिकारी, कर्मचारी असे एकूण 223 जणांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात उपअभियंता 20, लेखाधिकारी 2, लेखुलेखक 6, आरोग्य निरीक्षक 2, फार्मासिस्ट 12, कनिष्ठ अभियंता 4, कॉम्युटर ऑपरेटर 14, मुख्य लिपिक 33, लिपिक 103, लेखापाल 4, उपलेखापाल 13, लायब्ररी अटेंडंट 1, शिपाई 1 अशा विविध पदांवरील 223 जणांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button