ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

…तर विधानसभेच्या 288 जागा आम्ही लढवणार

मनोज जरांगे पाटलांचा फडणवीस शिंदेंना इशारा

छत्रपती संभाजी नगरः मी कुणालाच पाठिंबा दिलेला नाही. मी कुणालाच पाठींबा देत नाही. नोकरदारांची पदोन्नती होत नाही. दहा टक्के आरक्षण लोकांच्या कामाचे नाही. आता सामान्य मराठ्यांना वाटायला लागलंय की भरत्या थांबल्या आहेत. विधानसभेत गणित बिघडवणार नाही. मैदानातच मी राहणार आहे. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी करायला हवी. मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित केला नाही तर मी मैदानात उतरणार आहे. फडणवीस शिंदे यांना आवाहन आहे की, आमच्या हक्काचं आम्हाला द्या. दिलं नाही तर 288 जाागांवर आम्ही सर्व जाती-धर्माचे लोक निवडणूक लढवणार आहोत, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

राज्य सरकारने तात्काळ सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी न केल्यास 288 विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीत मी स्वतः देखील उभा राहीन, असेदेखील ते म्हणाले. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्या नेत्यांचा कार्यक्रम मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही.

लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही जरी उमेदवार उभे केले नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व समाजाला एकत्र करून निवडणूक लढणार असून याची तयारी एक महिन्यापासून सुरू केल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये सरकारने मराठा समाजाच्या एकीची धास्ती घेतली असून पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जात आहेत. तर नरेंद्र मोदींना देखील स्वतःचा प्रचार सोडून आता इतर नेत्यांचा देखील प्रचार करावा लागत आहे, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सहकारी असलेले गंगाधर काळकुटे यांनी बीडमधून लोकसभेचा अर्ज भरला होता. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, त्यांच्यामागे कोणी आहे का? कारण ते मला भेटून बीडमध्ये गेले आणि अचानक अर्ज कसा भरला याचा शोध घ्यावा लागेल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button