breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

महाराष्ट्राचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन

कोल्हापूर |

लालमातीत भल्याभल्यांना आस्मान दाखवून पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं आहे. ते 86 वर्षांचे होते. कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, अखेर आज त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे कुस्तीक्षेत्रावर शोककळा पसरलेली आहे. श्रीपती खंचनाळे यांची नोव्हेंबर महिन्यात प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, महिन्याभराच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आज सकाळी त्यांची उपचारदम्यान प्राणज्योत मालवलेली आहे. श्रीपती खंचनाळे हे भारताचे पहिले हिंदकेसरी होते. 1959 साली दिल्ली झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खंचनाळे यांनी हिंदकेसरीची पहिली गदा पटकावली होती. अनेक मैदाने गाजवणारा कुस्तीपटू अशी खंचनाळे यांची ओळख होती. हिंदकेसरीपद पटकावल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी मल्लांना आस्मान दाखवले होते. करतार पंजाबी, खडकसिंग, सादिक पंजाबी, मंगलराय, टायगर बच्चनसिंग, नजीर अहमद, मोती पंजाबी, गुलाब कादर यांसारख्या अनेक नावाजलेल्या मल्लांवर त्यांनी मात केली होती.

वाचा- महाराष्ट्राचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button