breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी प्रजासत्ताक दिनानिमित्त दृष्टीहीन रीना पाटील बनल्या एक दिवसाच्या पोलीस आयुक्त..!

पिंपरी |

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी दृष्टीहीन महिला तर अप्पर पोलीस आयुक्त पदी एकलमाता आणि पोलीस उपायुक्त पदी सर्व सामान्य लोकवस्तीतील विद्यार्थी विराजमान अनोख्या पध्दतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना कणखर अधिकारी म्हणुन ओळखलं जात. मात्र त्यांच्यातील संवेदनशीलताही पिंपरी चिंचवडकरांना अनुभवायला मिळाली. ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आपल्या पदाचा कार्यभार चक्क एका अंध महिलेच्या हाती सोपवला तर अप्पर पोलीस आयुक्त पदाची सुत्रे एका एकलमातेला आणि पोलीस उप आयुक्त पदाचा पदभार एका गरीब लोकवस्तीतील सुशिक्षित विद्यार्थ्याला बहाल करत सर्वांना आनंदाचा धक्का दिलेला आहे.

दि. २६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता हा सोहळा पार पडला. त्यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात वरील तीनही विशेष अतिथी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनातून दाखल झाले. तेव्हा स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांचे स्वागत केलेले आहे. तसेच पोलीस दलातील पथकाने सलामी देत गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर तिघेही कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांना सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या स्थानी विराजमान करीत मानवंदना देऊन दैनंदिन कार्याला सुरुवात केली. हा सगळा प्रकार उपस्थितांसाठी भाराऊन टाकणारा होता. मात्र एक दिवसासाठी पोलीस आयुक्त पदाचा आणि इतर पदभार स्विकारणार्या तिघांसाठीही हा क्षण अभिमानाचा होता.

“या क्षणाचा स्वप्नातही विचार केला नव्हता, आम्ही पुर्णतः अंध असल्याने फक्त पोलीसांबद्दल ऐकू शकतो. मात्र जे ऐकल ते खरं निघालं पोलीस खरेच सामान्य माणसाचे मित्र असतात. मी दिल्लीला गेले होते तेंव्हा घरच्यांनी सांगितले होते आधी पोलीसांना भेट ते तुला व्यवस्थित मार्गदर्शन करतील. आणि योग्य पत्त्यावर सोडतील. तसचं झाल कुठलीही स्वार्थ किंवा न्यूनगंड न बाळगता पोलीस मदत करतात. हे त्यांच मोठेपण, आज मी पोलीस आयुक्त या पदाची एक दिवसाची सुत्रे स्विकारल्यावर एक नक्की सांगावस वाटते की, कायदे कठोर आहेत पण त्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजेत तरच महिला सुरक्षित राहतील.

ज्योती माने- एकलमाता यांनी आपले मनोगत खालील शब्दात व्यक्त केले.

“पतीच निधन झाल्यानंतर समाजातील विकृत मानसिकतेचा परिचय झाला. अनेकवेळा हताश झाले. मुलीचा सांभाळही करायचा होता. अशा परिस्थितीत फक्त पोलीसांनी जगण्याचे बळ वाढवलं. आज जेंव्हा हा सन्मान स्विकारला त्याचा अपप्रवृत्तीचा सामना करण्याची ताकद वाढली. कुठल्याही महिलेवर अन्याय झाल्यास तिनेही पोलीसांची मदत घ्यावी ते आपल्यासाठीच असतात.”

दिव्यांशु तामचिकर : सर्वसामान्य लोकवस्तीतील सुशिक्षित विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मी अजुन लहान आहे. पण जिथे माझे १० वी पर्यंतच शिक्षण पुर्ण झालं त्या वस्तीत आजूबाजूला चुकीच्या माणसिकतेची लोकं होती. मी अभ्यास करुन चांगल्या गुणांनी पास झालो. आता महाविद्यालयात जाईल आज इथे खोटा पोलीस म्हणुन दाखल झालो असलो तरी भविष्यात खूप मेहनत करुन मी खराखुरा पोलीस अधिकारी म्हणुनच पोलीस मुख्यालयात दाखल होणार. मला आपल्या समाजाची मानसिकता बदलायची आहे.”

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या..!

समाजातील प्रत्येक घटकास न्याय हक्काची जाणीव व्हावी व सशक्त देशाचे नागरीक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी समजुन योगदान द्यावे. कायदे आणि व्यवस्थेपेक्षा संविधान मानणाऱ्या नागरिकांमुळे कुठलाही देश चालतो, प्रगती करतो. आज आपल्या देशातील लोकशाहीचा गर्व वाटतो. संविधानाने आम्हाला लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता शासन चालविण्याचे उद्दिष्ट दिले. त्याची प्रचिती प्रत्येक प्रजासत्ताक दिनी येतेच. मात्र आता हा सोहळा बघताना आम्ही आमच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी उभे आहोत, त्यांनाही आमच काम कळलं पाहिजेत आणि त्यांनाही आमच्या प्रति संवेदनशिलता दाखवली पाहिजे. त्याच बरोबर समाजातील सर्व घटका बरोबर आम्ही आहोत हे दाखविण्यासाठी हा उपक्रम घेण्याचा ठरवलं ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. “

वाचा- शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थानने महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या ‘कळसुबाई’ शिखरावर साजरा केला प्रजासत्ताक दिन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button