breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेराजकारण

…तर गरीब मराठ्यांना आरक्षणावर पाणी सोडावे लागेल : प्रकाश आंबडेकर

पुणे । प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभेत २८८ पैकी १८२ आमदार हे मराठा समाजाचे आहेत. हे सर्व श्रीमंत मराठा एकमेकांचे नातेवाईक असुन नात्यागोत्याचेच राजकारण करत असतात. त्यांच्या या राजकारणातून ते इतर सर्वांना व्यवस्थेच्या बाहेर ठेवतात. याला गरीब मराठा देखील अपवाद नाही, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

गरीब मराठ्यांनी दिलेल्या लढ्यामुळे जे आरक्षण मिळालं ते आता सर्वोच्च न्यायालयात आहे. श्रीमंत मराठ्यांची सत्ता असूनही हे प्रकरण अडकलं. पूर्वीपासूनच श्रीमंत मराठा सत्तेत आहे, परंतु हा श्रीमंत मराठा गरीब मराठ्यांसाठी लढत नाही. तमाम गरीब मराठ्यांना माझं आवाहन आहे, त्यांनी त्यांचा लढा उभारावा, त्याशिवाय त्यांना आरक्षण मिळणार नाही. सत्तेत असणाऱ्या श्रीमंत मराठ्यांविरोधात हे गरीब मराठा रस्त्यावर उतरतात का हे बघावं लागेल. जर ते उतरले, तर त्यांना आरक्षण मिळेल. जर असे झाले नाही, तर आरक्षणावर पाणी सोडावं लागेल, अशी शक्यताही प्रकाश आंबेडकर यांनी व र्तवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button