ताज्या घडामोडीराष्ट्रिय

बँका शनिवारपासून सलग ४ दिवस बंद

खासगीकरणाच्या विरोधात बँक आणि विमा कर्मचाऱ्यांनी सोमवारी २८ आणि मंगळवारी २९ मार्चला २ दिवसांचा संप पुकारला आहे. तर त्यापूर्वी २६ व २७ मार्चला चौथा शनिवार आणि रविवारची सुट्टी आहे. त्यामुळे बँका शनिवारपासून सलग ४ दिवस बंद राहणार आहेत. त्याचा परिणाम बँकांशी संबंधित व्यवहारांवर होणार आहे.

बँका, विमा कंपन्या आणि काही सरकारी उद्योगांचे खासगीकरण करण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला आहे. त्याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. याशिवाय बँकांमधील कंत्राटीकरण, कामाचे आउटसोर्सिंग आणि जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, या मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन हा संप पुकारला आहे. त्यात इतर बँक कर्मचारी संघटनाही सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे २८ आणि २९ मार्चला बँका व विमा कंपन्या बंद राहणार आहेत. त्याचा विपरीत परिणाम बँकिंग आणि विमा कार्यालयांच्या कामकाजावर होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली कामे त्यापूर्वीच उरकणे योग्य ठरणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button