breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेची “सफाई मोहीम”

विविध पदाधिकारी, अधिका-यांनी घेतला सहभाग

पिंपरी (महा ई न्यूज) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरापासून ते पिंपरी कॅम्पातील शगून चौकापर्यंत स्वच्छता करण्यात आली.

स्वच्छता मोहिमेत महापौर राहूल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहभाग घेतला. यांच्यासह या स्वच्छता मोहिमेत नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या सिमा सावळे, आशा धायगुडे, अश्विनी बोबडे, प्रियंका बारसे, नगरसदस्य विलास मेडीगेरी, शितल शिंदे, रवि लांडगे, नामदेव ढाके, स्विकृत सदस्य मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, माउली थोरात, सागर हिंगणे, दिनेश यादव, विठठल भोईर, माजी महापौर आर. एस. कुमार, माजी नगरसदस्य विजय लांडे, राजेश पिल्ले, सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे, भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात, महेश कुलकर्णी, दिपक मोढवे, रणजीत इंगळे, संजय मंगोडेकर, देवीदास पाटील, रघुनंदन घुले आदींचा सहभाग होते.

आज सकाळी आठ वाजता पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. पुतळयामधील मैदानाची स्वच्छता करुन रस्त्याच्या दोन्ही बाजूचे फुटपाथ साफ करण्यात आले. त्यानंतर गोकुळ हॉटेल रस्ता, इंदिरा गांधी उडडाणपूलाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. पिंपरीतील शगून चौकापासून डिलक्स थिएटर चौकापर्यंत सर्व पदाधिकारी, नगरसदस्य, अधिकारी व कर्मचारी आणि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष परिसराची साफसफाई केली. सदर स्वच्छता मोहिमेअंतर्गत सहा टाटा एस या वाहनामधून दोन टन कचरा उचलण्यात आला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button