breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडला अतिवृष्टीचा इशारा, महापालिका प्रशासनाला आली उशिरा जाग

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

हवामान खात्याने 3 ऑगस्ट रोजी पुणेसह पिंपरी-चिंचवडला अतिव्रष्टीचा इशारा दिला. त्यानुसार गेली दोन दिवस शहरात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. लागून राहिलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आता पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला उशिरा जाग झाली आहे. तब्बल तीन दिवसानंतर पिंपरी-चिंचवड शहराला अतिवृष्टीचा इशारा देण्यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आवाहन केले आहे.

कोविड 19 च्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन सैरभैर झाले आहे. दैनंदीन कामाचे नियोजन विस्कळीत होताना दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला अतिवृष्टीचा इशारा देण्यासंदर्भात 3 ऑगस्ट रोजी निवेदन जाहीर केले. तरी, निद्रावस्थेत असलेल्या पालिका प्रशासनाला याबाबत आज जाग झाली आहे. आयुक्त हर्डीकर यांनी यासंदर्भात तत्काळ आदेश काढून पिंपरी-चिंचवड शहराला अतिवृष्टीचा इशारा असल्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आज आणि उद्या (दि. 6 ऑगस्ट) नागरिकांनी गरजेनुसारच घराबाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

  • जोरदार पाऊस पडत असल्यास घरीच थांबा
  • अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका
  • पाण्यातील विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रिक डिपीला स्पर्श करू नये
  • पादचारी भुयारी मार्ग (अंडरपास) तसेच पाणी साचलेल्या भागातून वाहनास व पायी जाऊ नये
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button