पिंपरी / चिंचवड

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

पिंपरी l प्रतिनिधी

एका व्यक्तीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केला. महिलेने व्यक्तीला विरोध केला असता तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा बलात्कार केला. ही घटना 7 ऑक्टोबर 2021 ते 7 जानेवारी 2022 या कालावधीत वाकड व पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. 2) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंकजकुमार मिश्रा (वय 34, रा. वाकड. मूळ रा. सोनभद्र, उत्तर प्रदेश) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत सुरुवातीला ओळख केली. त्यानंतर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून महिलेसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्यानंतर महिलेने शारीरिक संबंधास नकार दिला. त्यामुळे आरोपीने महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपीचे लग्न झाल्याचे समजल्यानंतर फिर्यादी महिलेने त्याबाबत जाब विचारला असता आरोपीने महिलेला मारहाण केली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button