breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मार्शल आर्ट ब्लॅक बेल्ट परीक्षेत चमकले मिक्स मार्शल आर्ट संस्थेचे १७ विद्यार्थी

पिंपरी |

आंतरराष्ट्रीय स्तरावरील निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या मिक्स मार्शल आर्ट ब्लॅक बेल्ट परीक्षेत मिक्स मार्शल आर्ट संस्थेचे (एनबीएसएस) 17 विद्यार्थी चमकले आहेत. या स्पर्धेमध्ये आर्या पवार, आर्यन पवार, सिध्दार्थ चव्हाण, सिध्दार्थ सोनवणे, निल बेंडबर, प्रतीक चास्कर, उत्कर्ष सारस्वत, ईशा देशमुख, फातेमा शेख, बालकृष्ण पुजारी, कार्तिक लमतुरे, रियाना चेन्नकर, प्रतीक पांचाळ, प्रियांका बाबर, मायकल डेविड, अशरफ शेख, यांना शोदान ब्लॅक बेल्ट व तेजस सुर्वे यांनी ब्लॅक बेल्ट मिळविले.

दळवीनगर येथे ब्लॅक बेल्ट प्रदान कार्यक्रम पार पडला . राष्ट्रवादी पदवीधर संघ अध्यक्ष माधव धनवे-पाटील , असिफ पठाण, सामाजिक कार्यकर्ते वाळूंज काका आणि शंकर पवार यांच्या उपस्थित सर्व ब्लॅक बेल्ट धारकांना प्रशस्ती पत्रक देण्यात आले. तसेच यावेळी कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ इंडिया व निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडियाचे अध्यक्ष मेहुल वोरा यांच्या मार्गदर्शनाखाली कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार व कुडो असोसिएशन महाराष्ट्रचे सचिव जस्मिन मकवाना, कुडो रेफ्री कौन्सिल विपुल सुरु पुणे जिल्हा निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडियाचे अध्यक्ष अरविंद मोरे, कुडो असोसिएशन पुणे सचिव राजू गोसावी, पिंपरी चिंचवड कुडो असोसिएशन अध्यक्ष प्रविण मेळावणे , पिंपरी चिंचवड कुडो असोसिएशन सचिव राहुल पवार उपस्थित या विद्यार्थाना प्रशिक्षक राहुल पवार व राजू गोसावी यांचे वैयक्तिक मार्गदर्शन लाभले आहे

  • निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया संस्थेविषयी

निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया ही संस्था कराटे प्रशिक्षण देणारी मान्यताप्राप्त संस्था आहे. निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया संस्थेमार्फत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, तसेच अभिनेत्री कतरीना कैफ, सोनाक्षी सिन्हा, अभिनेते रणवीर कपूर, कपिल शर्मा, विकी कौशल, टायगर श्रॉफ असून त्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान केलेला आहे . आता पर्यंत पुणे जिल्हातील 59 जणांना ब्लॅक बेल्टमिळालेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button