breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नोव्हेंबर महिन्यात बँका सतरा दिवस बंद राहणार

मुंबई – नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित काही कामे असतील तर ती लवकर पूर्ण करा. नोव्हेंबर २०२१ मध्ये धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छठपूजा, गुरूनानक जयंती यासारख्या सुट्टया आहेत. अशावेळी एकूण १७ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये भारतभरातील सुट्ट्यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने नोव्हेंबर महिन्यासाठी अधिकृत सुट्ट्यांची यादी जारी केली आहे, त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात १७ सुट्ट्या आल्या आहेत. यादरम्यान भारतातील अनेक शहरांमध्ये बँका सतरा दिवस बंद राहतील. या १७ दिवसांच्या सुट्टीमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवारी तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत, आरबीआयने १, ३, ४, ५, ६, १०, ११, १२, १९, २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय महिन्यातील चार रविवार आणि दुसरा व चौथ्या शनिवारी सुट्ट्या आहेत. तर महाराष्ट्रात २ नोव्हेंबर – धनत्रयोदशी, ४ नोव्हेंबर – नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, ५ नोव्हेंबर – बलिप्रतिपदा, ६ नोव्हेंबर – भाऊबीज आणि ७ नोव्हेंबर रोजी रविवारी सुट्ट्या आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button