TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली येथील प्रस्तावित हॉस्पिटलला मुख्यमंत्र्यांचा “ग्रीन सिग्नल”

  • वन विभागाच्या जागा हस्तांतरण मागणीला सकारात्मक प्रतिसाद
  • भाजपाचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे निवेदन

पिंपरी | प्रतिनिधी

चिखली परिसरातील वन विभागाच्या जागेचा ताबा प्रस्तावित हॉस्पिटलसाठी महापालिका प्रशासनाकडे देणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. त्यामुळे समाविष्ट गावात आणखी एक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चिखलीतील प्रस्तवित रुग्णालयाच्या जागेसाठी वन विभागाने ताबा द्यावा. यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश झाल्यापासून चिखली आणि परिसरात मोठ्याप्रमाणात नागरीकरण वाढले आहे. वाढत्या नागरीकरणाच्या दृष्टीने या भागात शासकीय आरोग्य सुविधा अद्याप सक्षम नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपचारांसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अथवा अन्य रुग्णालयांकडे धावाधाव करावी लागते.
दरम्यान, चिखली येथे वन विभागाच्या हद्दीतील गट क्रमांक 1653 मध्ये सुमारे 20.22 हेक्‍टर जागेचा ताबा महापालिका प्रशासनाला मिळाल्यास या ठिकाणी प्रशस्त रुग्णालय उभारता येईल. याबाबत सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वन विभागाकडून जागेचा ताबा महापालिका प्रशासनाला मिळणे अपेक्षीत आहे.
सध्या ‘वायसीएम’ रुग्णालयात पिंपरी-चिंचवडसह लगतच्या मुळशी, मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्‍यांसह अन्य जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी येतात. तुलनेने खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळ तालुक्‍यातील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याचा ताण ‘वायसीएम’वर येत आहे. त्यातील उपलब्ध मनुष्यबळ आणि विस्तार क्षमतेला मर्यादा आहेत. त्यामुळे वायसीएमला पर्यायी वैद्यकीय व्यवस्था उभी करणे पिंपरी-चिंचवडसह समाविष्ट गावांसाठी अत्यावश्‍यक आहे.
त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा म्हणून चिखलीत तात्काळ रुग्णालय सुरू करणेकामी वन विभागाच्या ताब्यातील जागा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करावी. व त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही कुंदन गायकवाड यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button