breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ४१ हॉटेल- लॉजवर बेकायदा वेश्याव्यवसाय

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्र परिसरातील ४१ हॉटेल आणि लॉजवर देहविक्रीचा व्यवसाय सुरू आहे. तसेच अवैध धंद्याचे आगार बनले आहे. मटका, जुगार, बेकायदा मद्यविक्री व हुक्का पार्लरमुळे गुन्हेगारीत सातत्याने वाढ होवू लागली आहे.

शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही आर्थिक उलाढालीमुळे राजकीय नेते गप्प आहेत. तर पोलिसांच्या आशीर्वादाने सर्वकाही आलबेल आहे. तीर्थक्षेत्र आळंदी रस्त्यावरील देहूफाटा, चºहोली फाटा व मरकळ रस्ता या ठिकाणी दिवसाढवळ्या देहविक्री करणाºया महिला येथून मार्गस्थ होणाºया भाविकांना खुणावत उभ्या राहतात.

या व्यवसायामध्ये रस्त्याच्या आजूबाजूला असलेले हॉटेल व लॉजधारक सामील आहेत. आळंदी रस्ता, तळेगाव ते वडगाव मावळ महामार्ग, देहू व च-होली फाटा, भोसरी, पिंपरी व निगडी येथील सुमारे ४१ हॉटेल व लॉजवर हा वेश्याव्यवसाय खुलेआम सुरू आहे. हे माहिती असूनही कारवाईऐवजी पोलिसांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात

शहरातून पुणे-नाशिक, पुणे-मुंबई, तसेच मुंबई-बेंगळुरू महामार्ग जातात. देहविक्रय करणाºया महिला या महामार्गांवर दररोज सायंकाळनंतर ठिकठिकाणी घोळक्याने दिसून येतात. वाहनचालकांना हात दाखवून तसेच खुणावून थांबवितात. वाहनचालक तसेच लहान मुले व इतर प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button