breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चित्रपट पाहून युवकाने केला मित्राचा खून

पिंपरी|महाईन्यूज|

महागडी कार घेण्यासाठी एका युवकाने मित्राचे अपहरण करुन त्याचा खून केला. सदर खळबळजनक घटना ही पुणे विद्यापीठाच्या आवारात घडली आहे. दाक्षिणात्य चित्रपट पाहून युवकाने हा खून केल्याची कबुली भोसरी पोलिसांना दिली आहे.

अब्दुल अहाद तय्याब सिद्दीकी वय- १७ रा.दापोडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, उमर नसीर शेख वय- २१ रा.खडकी असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मित्राचे नाव आहे. काल रात्री ८ वाजता राहत्या घराजवळील परिसरातून शेख हा सिद्दिकीला घेऊन गेला होता. त्यानंतर दोघे बिअर प्यायले. शेख याने सिद्दीकी च्या घरी फोन करून ४० लाखांची खंडणी मागितली.

मयत अब्दुलचे वडील हे भंगारचा व्यवसाय करत असल्याने कुटुंबाकडे एवढे पैसे नसल्याचे समजताच शेख याने सिद्दीकी चा गळा आवळून खून केला. ‘खतरनाक खिलाडी २’हा दाक्षिणात्य चित्रपट पाहून युवकाने हा खून केल्याची कबुली भोसरी पोलिसांना दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button