breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 102 पॉझीटिव्ह केसेस, एकाचा मृत्यू

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आज दिवसभरात 102 जणांना कोरोनाची लागन झाली आहे. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर शहरात एकूण 95 हजार 333 कॉरोना पॉझिटिव्ह केसेस नोंद झाल्या आहेत. शहरातील पॉझीटिव्ह रुग्णसंख्या कमी होत नसली तरी महापालिका हद्दीबाहेर आज दिवसभरात एकही पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. यावरून शहरातील संक्रमितांचा आकडा निश्चितच कमी होईल, असा अंदाज बांधला जात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. ही बाब शहरवासियांसाठी समाधानाची असली तरी नागरिकांना काळजी घेण्याबाबतचे आवाहन महापालिका प्रशासनाने वारंवार केले आहे. त्यानुसार प्रत्येकाने सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटाझरचा वापर करणे तितकेच गरजेचे आहे. कारण, कोरोना विषाणुची बाधा होऊन आजपर्यंत एकूण 1 हजार 735 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात 960 घरांना भेटी देण्यात आल्या. त्यातील 3 हजार 237 लोकांचे सर्वेक्षण केले. त्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये केवळ 102 जण पॉझीटिव्ह आढळून आले. संशयीत अशा 1 हजार 942 जणांना दाखल करून घेतले आहे. तर, 1 हजार 612 जणांची तपासणी नकारात्मक आली आहे. तथापि, 2 हजार 131 लोकांचा चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहे. 754 जण रुग्णालयात दाखल आहेत. 1 हजार 912 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज एकूण 77 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button