breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा बंद

पिंपरी |महाईन्यूज|

रावेत येथील जलउपसा केंद्रातील नियमित देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि.26) करण्यात येईल. त्याकरिता शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर शहरातील सर्व भागाचा दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होणार आहे.

पिंपरी-चिंचवडकरांना मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पालिका रावेत बंधा-यातून पाणी उचलते. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन शहराला पाणीपुरवठा केला जातो.

रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून येणाऱ्या उच्च दाबाच्या पंपिंग मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबविणे. विद्युत विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची कामे करणे, निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा व पाणीपुरवठा विषयक कामे आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे.

या कामासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागाचा दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button