breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये गावकी-भावकीच्या ठराविक घराण्याकडे शहराचा कारभार

जनतेला आता झेंडा नको अजेंडा हवा, फेब्रुवारी 2022 ची पालिकेची निवडणूक लढविणार

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 50 वर्षात गावकी-भावकीतीलच राजकारण होवून ठराविक घराण्यांच्या हातात कारभार जात आहे. प्रस्थापित पक्षातून भ्रष्ट व्यवस्था आणि टक्केवारी मिळवण्याचे उदिष्ठ राहत आहे. त्यामुळे जनतेला आता झेंडा नको तर अजेंडा हवा असून फेब्रुवारी 2022 मधील महापालिका निवडणुक आम्ही लढविणार आहे, अशी माहिती पुण्याचे शहराध्यक्ष मुकूंद किर्दत यांनी दिली.

चिंचवड येथे आम आदमी पार्टीची आज (बुधवारी) पत्रकार परिषद झाली. यावेळी संघटनमंत्री डॉ. अभिजीत मोरे, पिंपरीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष अनुप शर्मा, सचिव राघवेंद्र राव उपस्थित होते. मुकुंद किर्दत म्हणाले, दिल्ली निवडणुकीमुळे देशातील राजकारणाचा पोत बदलत आहे. कामाला लोक मत देत आहेत. आम आदमीने कामावर मते मागत दिल्ली जिंकली. बलाढ्य अशा भाजपला दिल्लीतील सर्वसामान्य जनतेने पराभवाची धूळ चारली.

प्रस्थापित पक्षांची भ्रष्ट व्यवस्था सर्वसामान्य जनतेला नकोशी आहे. सर्वपक्षीय मिळून महापालिकेत टक्केवारीचे राजकारण करीत असून टक्केवारीचे राजकारण संपविणार आहे. तसेच महापालिकेने पाण्याची श्वेतपत्रिका काढावी. गळती रोखावी त्यानंतरच कपात लागू करावी. महापालिका शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देऊ शकत नाही. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

तसेच पिंपरी चिंचवडमध्ये स्वराज्य मॉडेल समोर ठेवून कामकाज करणार आहे. शहरातील 32 प्रभागातील नागरिकांना विचारुन समस्यांची यादी तयार केली जाईल. ती यादी नगरसेवकाला तारीख टाकून पाठविण्यात येणार आहे. ऑनलाईन देखील टाकण्यात येईल. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल. या समस्यांची दर महिन्याला नगरसेवकाला आठवण करुन देण्यात येईल. नगरसेवक छोटे प्रश्न सोडवायला किती दिवस घेतात हे नागरिकांना कळेल. त्यानुसार प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकाचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button