breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हिमाचल प्रदेशात शाळा सुरू होण्यापूर्वी 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

शिमला – मागील वर्षी शैक्षणिक सत्र संपतानाच कोरोना विषाणूने भारतात शिरकाव केल्यामुळे अनेक परीक्षा रद्द कराव्या लागल्या, तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षाचेही कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता हळूहळू देशभरातील शाळा सुरू होत आहेत. त्यातच हिमाचल प्रदेशातील तब्बल 41 शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

हिमाचल प्रदेशात फेब्रुवारी महिन्यात सरकारी शाळा सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून सरकारी शाळांमधील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होतील. तर डिग्री कॉलेज 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. खासगी शाळांनाही याच कालावधीमध्ये नियमित वर्ग सुरु करण्यास सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र त्यापूर्वी राज्यातील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. राज्याच्या मंडी जिल्ह्यातील शिक्षकांची शनिवारी तपासणी करण्यात आली. त्यावेळी तब्बल 41 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

राज्यातील सर्व शाळांना वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहणारे विद्यार्थी आणि त्यामधील कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी यांचा अहवाल 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यातून सरकारी शाळांमधील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पालकांच्या काळजीत भर पडली आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 57424 वर पोहोचली आहे. यापैकी 314 सक्रीय रुग्ण आहेत, तर 56131 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत 963 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button