breaking-newsमनोरंजन

‘राझी’मुळे अलियाचा भाव वधारला

हल्ली आलिया खूपच आनंदात असते. तिचा “राझी’ हिट झाल्यामुळे तिला एकदम भारी वाटायला लागले आहे. बॉक्‍स ऑफिसवर “राझी’ने भरपूर कमाई करायला सुरूवात केल्यामुळे आलियाचे स्टारडम एकदम वाढले आहे. बॉलिवूडमधील चुलबुली गर्लने या यशाला एकदम एन्कॅश करायचे ठरवले आहे. तिने आपल्या मानधनाच्या रकमेमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. अतापर्यंत कोणत्याही सिनेमासाठी आलिया 5 कोटी रुपयांचे मानधन आकारत होती. मात्र आता तिने आपल्या मानधनाचा आकडा 9 कोटी रुपयांपर्यंत नेऊन ठेवला आहे. हा बदल तिने अलिकडेच केला आहे.

गेल्या वर्षभरात डझनभर सिनेमे करणाऱ्या आलियाचे हे बहुतेक सिनेमे हिट झाले आहेत. केवळ “शानदार’ या एकाच सिनेमाला अपेक्षित यश मिळालेले नव्हते. तिने मानधन वाढवण्यामागे करण जोहरचा हात आहे. “राझी’च्या यशानंतर करणने खूप विचारपूर्वक अलियाचे मानधन निश्‍चित केले. सर्वसाधारणपणे महिला प्रधान सिनेमांचे यश जेमतेम 100 कोटींच्या आसपास असते. मात्र “राझी’ने तर 100 कोटींचा टप्पा केंव्हाच पार केला आहे. आलियाच्या आगोदर दीपिका पदुकोण, कंगणा रणावत, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ आणि करीना कपूरनेही आपल्या मानधनात अशीच वाढ केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button