breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये आणखी 5 कोरोनाबाधितांची पहिली टेस्ट निगेटिव्ह

आज या रुग्णांचे दुसरे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार

पिंपरी – पिंपरी चिंचवडमध्ये आणखी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची पहिली टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. काल कोरोनामुक्त तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.. त्यापैकी एका रुग्णाच्या घरातील चार बाधितांची टेस्ट आज निगेटिव्ह आली. तर थायलंडहून आलेल्या एका तरुणाची देखील टेस्ट निगेटिव्ह आली. या 5 रुग्णांना 14 मार्चला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आज या रुग्णांचे दुसरे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आज घडीला राज्यात 156 देशात 863 जण कोरोनाचे पॉझिटिव्ह आहेत. तर, आतापर्यंत 17 जणांचा यात बळी गेलाय. दिलायसादायक बाब म्हणजे यातील 73 जण पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button