breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरण भरले, तरीही पिंपरी-चिंचवड शहराची दिवसाआड पाणी कपात रद्दचा फैसला सोमवारी

  • आयुक्त म्हणतात, महापाैर, गटनेत्यांच्या बैठकीत होईल निर्णय
  • खासदार, आमदार, विरोधी पक्षांच्या नगरसेवकांची आयुक्तांनी मागणी धुडकावली

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण आज (शनिवार) शंभर टक्के भरले आहे. तरीही महापालिका आयुक्तांसह पाणी पुरवठा विभागाकडून शहरातील दिवसाआड पाणी कपात रद्द करण्यास अद्यापही टाळाटाळ करण्यात येत आहे. दिवसाआड पाणी कपात रद्द करा, असे भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यासह विविध पक्षाच्या पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. त्या सर्वांची मागणी आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी धुडकावली असून महापाैर, गटनेत्यांच्या बैठकीत यावर निर्णय होईल, असे सांगण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड शहरासह मावळाला पिण्याचे पाणी पुरविणा-या पवना धरणात शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पवना धरणातून हायड्रो मार्गे 1400 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. मात्र, पावसाची संततधार कायम असल्याने आज (शनिवार)  दुपारी 12.30 च्या दरम्यान धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले आहेत. तसेच या दरवाजांमधून 4200 क्युसेक असा एकूण 5600 क्युसेकने विसर्ग सुरु आहे, अशी माहिती तेथील अधिका-यांनी दिली.

पवना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. मागील 24 तासात धरण परिसरामध्ये 115 मिमी पावसाची नोंद झाली. धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे नदी काठच्या गावे, नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, पवना धरण शंभर टक्के भरलेले आहे. धरणातून सुमारे साडेपाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्यस्थिती पिंपरी चिंचवड शहरात दिवसाआड पाणी कपात अजूनही सुरुच आहे. स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी पाणी कपात रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे. परंतू, आयुक्त म्हणतात. पाणी कपात रद्द करण्याबाबत महापाैर, गटनेते, अन्य पदाधिकारी, पाणी पुरवठा प्रशासन यांची सोमवार (दि.5) बैठक आयोजित करण्यात आलेली असून त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येईल. असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button