breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने ३ माजी आमदारांविरोधात गुन्हा दाखल

अकोला – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशात सर्व पातळ्यांवर खबरदारी घेतली जात आहे. अशातच अकोल्यात मोर्चामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्याने 3 माजी आमदारांवर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा समावेश आहे.

अकोल्यात काल ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा शहरातल्या स्वराज्य भवनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता, या मोर्चात जवळपास 300 ते 400 मोर्चेकरी सहभागी झाले होते. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने मोर्चात सहभागी 3 माजी आमदारांसह 33 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी मोर्चाचे आयोजन करणे आणि कोणत्याही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्याने कलम 188, 269, भादंवि 135 बीपी ऍक्ट तसेच साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 3 अन्वये सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button