breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी- चिंचवडमध्ये आज 92 कोरोना पॉझिटिव्ह; 57 जणांना मिळाला डिस्चार्ज

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

शहराच्या विविध भागातील 84 आणि महापालिका हद्दीबाहेरील 8 अशा 92 जणांना मंगळवारी कोरोनाची लागण झाली आहे.  महापालिका रुग्णालयातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 57 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, दापोडीतील 70 वर्षीय वृद्ध महिला आणि लोनावळ्यातील 57 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 1330 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

शहरातील रमाबाईनगर पिंपरी, ताम्हाणेवस्ती निगडी, तापकीरनगर मोशी, प्रियदर्शनीनगर सांगवी, निगडी, खराळवाडी, बौध्दनगर पिंपरी, नवभारतनगर दापोडी, अजंठानगर आकुर्डी,पीसीएमसी बिल्डिंग निगडी, तापकिर चौक काळेवाडी, महात्माफुलेनगर दापोडी, मोरवाडी रोड चिंचवड, नेहरुनगर, मोरेवस्ती चिखली, धावडेवस्ती भोसरी, नढेनगर काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, अजिंक्यनगर काळेवाडी, नवलेवस्ती चिखली, साईबाबानगर चिंचवड, नागेश्वरनगर मोशी, नाणेकर चाळ पिंपरी, चक्रपाणी वसाहत भोसरी, चिंचवडगांव, जाधव चौक  दापोडी, बौध्दनगर, डी. वाय. पाटील होस्टेल, जयभीमनगर दापोडी, पंचतारानगर आकुर्डी परिसरातील 84 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 48 पुरुष आणि 36 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.  शिवाय येरवडा, कोंढवा, जळगांव, खडकीतील पाच पुरुष आणि तीन महिलांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.  त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, दत्तनगर थेरगांव, आनंदनगर चिंचवड, बौध्दनगर, सिध्दार्थनगर दापोडी, गुलाबनगर दापोडी, साईबाबानगर चिंचवड,  अशोकनगर पिंपरी, सद्गुरुकॉलनी वाकड, अजंठानगर आकुर्डी, भाटनगर, खंडोबामाळ भोसरी, काळेवाडी, महात्माफुलेनगर भोसरी, जुनी सांगवी, नाणेकरचाळ पिंपरी, रमाबाईनगर पिंपरी येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 57 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 1330 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 791 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 23 जणांचा तर शहराबाहेरील परंतु महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 20 अशा 43 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 499 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 259

#निगेटीव्ह रुग्ण – 150
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 291
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 787
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 178
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 1330
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 499
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  43
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 791
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 21978
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 67314

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button