breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

मास्कचा वापर आणि तीन फूटांचे सोशल डिस्टेंसिंगचा पर्याय देखील फोल ठरतोय ?

कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी जगभरात मास्क आणि फेसशिल्डचा वापर करण्याबाबतचा आग्रह केला जात आहे. मात्र, मास्कचा वापर आणि तीन फूटांचे सोशल डिस्टेंसिंगचा पर्याय अंमलात आणल्यानंतर देखील कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.

सायप्रसमधील युनिर्व्हसिटी ऑफ निकोसियाच्या वैज्ञानिकांनी केलेला दावा धक्कादायक आहे. मास्क घातल्यानंतरही किमान ६ फूटांचे अंतर ठेवणे आवश्यक असल्याचे संशोधकांनी सांगितले. संशोधक दिमित्रस डिकाकिस यांनी सांगितले की, मास्कच्या वापरामुळे कोरोनाचा संसर्ग रोखता येणार नाही. काही ड्रॉपलेट मास्क शील्डच्या आतमध्ये शिरू शकतात. इतकंच नव्हे तर रुग्णाचे ड्रॉपलेट ४ फूटापर्यंत उडू शकतात, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाबाधित जर सातत्याने खोकत असेल तर मास्कच्या वापराचा काहीही उपयोग होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. काही ठिकाणी सोशल डिस्टेंसिंगच्या नियमात शिथिलता देण्यासाठी उद्योजकांकडून सरकारकडून दबाव टाकण्यात येत असताना हे संशोधन समोर आले आहे. करोनाचा संसर्ग फैलावण्याचा वेग कमी करण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी मास्क आणि फेसशिल्डचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button