breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील ‘नमो थाळी’ केंद्राचे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून कौतूक

माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्या उपक्रमाला दाद

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘नमो थाळी’ केंद्राला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी भेट दिली.

अतिशय उदात्त भावनेतून सुरु केलेल्या या योजनेतून YCM रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना अवघ्या २० रुपयात जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे.

YCM रुग्णालय PCMC असल्याने यात शहरासह आसपासच्या गावातील रुग्ण दाखल होत असतात.रुग्णांना दाखल केल्यानंतर त्यांच्या जेवणाची गैरसोय निर्माण तर होत होतीच, शिवाय बाहेरील तुलनेने जास्ती पैसे देऊन जेवण करावे लागत होते. यावर पर्याय म्हणून ‘नमो थाळी’ शहिंगे यांनी प्रत्यक्ष साकारली.

या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. समाजातील समस्या बारकाईने समजून घेत त्यावर आपल्याच पातळीवर पर्याय काढण्याचा हिंगे यांचा प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगा आहे, असे कौतुकही वाघ यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button