breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Covid-19: महाराष्ट्रासाठी GOODNEWS! राज्यातील रिकव्हरी रेट आता 85.65 टक्क्यांवर

मुंबई: कोरोनाने महाराष्ट्रासह संपूर्ण जगात थैमान घातलेले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्य गेल्या सात महिन्यांपासून कोरोना संकटाशी लढा देत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्याला मात देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केलेले जात आहेत. यामुळे राज्यातील कोरोनामुक्तांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे समजत आहे.

राज्यात आज तब्बल 14 हजार 238 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे एकूण कोरोनामुक्तांची संख्या 13 लाख 38 हजार 321 वर पोहचली असून राज्यातील रिकव्हरी रेट आता 85.65 टक्क्यावर पोहचलेला आहे. महाराष्ट्र गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. मात्र, राज्यात अनलॉकच्या अंतर्गत लॉकडाऊनच्या अनेक निर्बंधाना शिथिलता देण्यात सुरुवात झाली आहे.

राज्यातील बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. यामुळे लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचणींना सामोर जावा लागणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. या काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावलेले आहे. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button