breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी आयुक्तावर भाजपकडून निष्क्रीयेचा ठपका ; महासभेत बदलीचा ठराव मंजूर करा

माजी नगरसेवक मारुती भापकर यांची मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर हे शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. कचरा, पाणी, रस्ते यासह मुलभूत समस्या सोडविण्यास अपयशी ठरले आहेत. आयुक्तांची प्रशासनावरील पकड ढिल्ली होवून पाणी, कचरा प्रश्न बिकट झाला आहे. नागरी सुविधांचा बोजबारा उडाला आहे. त्यामुळे आयुक्त निष्क्रीय असल्याचा ठपका ठेवत भाजप नगरसेवकांनी स्थायीची आज (बुधवारी) सभा त्याग केली. त्यामुळे उद्या (गुरुवारी) होणा-या महासभेत आयुक्तांच्या बदलीचा ठराव मांडून तो मंजूर करावा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली. 

भापकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकांत म्हटले आहे की,  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठक पार पडली. यावेळी अनेक प्रकल्प मंजूरीसाठी समिती समोर होते. बैठकीच्या सुरुवातीलाच सत्ताधारी भाजपाचे सदस्य सागर आंघोळकर (पिंपळे गुरव ) व विकास डोळस (दिघी) या सदस्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर व त्यांच्या प्रशासनावर हल्ला करताना म्हणाले की, आयुक्तांची प्रशासनावरील पकड ‍ढिल्ली झाली असून पाणी प्रश्न बिकट बनला आहे. नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. आयुक्त निर्ष्कीय आहेत. आमचा सत्ताधारी म्हणून तुमच्यावर (आयुक्ता) वचक राहलेला नाही. अशी भूमिका घेऊन नागरी सुविधा देण्यामध्ये प्रशासन सुधारणा करत नाही. प्रशासन गतीमान होत नाही त्यामुळे शुक्रवार पर्यंत सभा तहकूब करावी अशी भूमिका सत्ताधारी भाजपा सदस्यांनीच घेतली. हा आयुक्तांना घरचा आहेरच म्हटले पाहीजे. आजची सभा कुठलेही कामकाज न करता तहकूब करण्यात आली.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते वादग्रस्त ठरलेले असून त्यांच्या कार्यकालात भ्रष्टाचार गैरव्यवहार, बेकायदेशीर कामे, सल्लागार नियुक्त्या यामध्ये मोठ्या प्रमाणात करदात्या नागरीकांचे नुकसान झाले असून केवळ घाई गडबडीत नवनविन टेंडर ठेकेदार, सल्लागार या चौकटीत  आयुक्त अडकले असून ते जास्त्तीत जास्त वेळ अशा कामांसाठी देत असल्यामुळे शहरातील पाणी समस्या,  कचरा समस्या, ड्रेनेज समस्या, सार्वजनिक वाहतूक,  नदी प्रदुषण, आरोग्य अशा मुलभूत समस्यांकडे त्यांचे सपसेल दुर्लक्ष झाले. त्यामुळे ते त्यांच्या पदाला साजेल असे काम करण्यात अयशस्वी ठरले आहे.

याबाबत गेले दिड वर्ष आम्ही वारंवार टिका करत आलो आहे. मात्र आज सत्ताधारी भाजपाचे सदस्य सागर आंघोळकर (गुरव पिंपळे) व विकास डोळस (दिघी) या सदस्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर वरील टिका केल्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर हे निर्ष्कीय आहेत यावर शिका मोर्तब झाले आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षानेच आयुक्तांच्या बदलीचा प्रस्ताव महापालिका सभेसमोर ठेऊन मंजूर करावा म्हणजे आजचा सत्ताधारी पक्षाचा विरोध खरा होता हे सिद्ध होईल. मात्र सत्ताधारी भाजपाने असे केले नाही तर आर्थिक हितसंबंध बिघडले किंवा काही तरी इशिप्त साध्द करण्या करिता होता. किंवा भाजपाने मोठी मांडवली केली, असल्याचा आरोप भापकर यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button