breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेत कमला हॅरिस यांच्या फोटोवरून वाद

वॉशिंग्टन – अमेरिकेतील सत्तापालट ट्रम्प समर्थकांना पचलेले नसतानाच आता नव्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या फोटोंवरून वाद निर्माण झाला आहे. ‘व्होग’ हे अमेरिकेतील फॅशन आणि लाइफस्टाइल या विषयाला वाहिलेलं नियतकालिक आहे. कमला हॅरिस निवडून आल्यानंतर ‘व्होग’ने फेब्रुवारी महिन्याच्या अंकाच्या मुखपृष्ठासाठी निवडलेले त्यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंमध्ये हॅरिस यांच्या त्वचेचा रंग आहे त्यापेक्षा अधिक उजळ करण्यात आल्याचे दिसते. हिच बाब अमेरिकी लोकांना आवडलेली नाही. अनेकांनी ट्विट करून याबाबत आपली नापसंती व्यक्त केली आहे. एवढेच नाही, तर कमला हॅरिस यांचा मूळ रंग दाखवणारे फोटोही लोकांनी ट्विटरवर पोस्ट केले आहेत. तसेच यापेक्षा चांगले फोटो आम्ही काढून देतो असा दावाही अनेकांनी केला आहे. परंतु ‘व्होग’ने मात्र कमला हॅरिस यांचा रंग उजळ केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे पण त्यांची भूमिका लोकांना फारशी पटलेली नाही.

दरम्यान, ‘अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकीर्दीत त्यांच्या पत्नी आणि तेव्हाच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांचे फोटो ‘व्होग’सह अनेक नियतकालिकांच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु माझ्या कारकीर्दीत ‘व्होग’ने एकदाही माझ्या पत्नीचे मेलेनिया ट्रम्पचे फोटो आपल्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध केले नाही’, अशी तक्रार गेल्याच महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. त्यानंतर आता कमला हॅरिस यांच्या फोटोशॉपमुळे ‘व्होग’ वादाच्या फेऱ्यात सापडलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button