breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: मुस्लिम बांधवांनी ‘रमजान सब्र’ च्या महिन्यात दानधर्माच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांना बळ द्यावे : कामगार नेते इरफान सय्यद

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणा-यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाॅकडाऊनमुळे शहर पूर्ण ठप्प झाले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणेच माथाडी कामगारांचे रोजगार बुडाले आहेत. माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कठीण संकटकाळात, बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्राचे कामगार नेते तथा भोसरी-खेड विधानसभेचे सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मजदूर संघटना कामगारांच्या मदतीला धावून आली आहे.

ही संघटना नेहमीच असंघटीत बांधवांच्या हिताचा विचार करीत, त्यांच्यासाठी झटत असते. कोरोना युद्धातही संघटनेच्या माध्यमातून शहरातील गोर-गरिबांन मदत व्हावी यासाठी शहरात विविध उपक्रम सुरु आहेत. गोरगरीब मुस्लीम बांधवांचेदेखील लॉकडाऊन मुळे हाल होत आहेत. त्यातच मुस्लीम बांधवांचे पवित्र रमजान महिन्याचे उपवास आजपासून सुरु झाले आहेत. त्यांच्यासाठी देखील इरफानभाईंची संघटना मदतीसाठी सरसावली आहे. तसेच पवित्र ‘रमजान’ हा सब्र चा महिना आहे. मुस्लिम बांधवांनी या महिन्यात दानधर्माच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कोरोना योद्ध्यांना बळ द्यावे. 

दरम्यान,  महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने यमुनानगर निगडी येथे माथाडी कामगार बांधवांना पीठ, तांदुळ, डाळ, तेल, मीठ, मिरची, मसाले व आदी जीवनावश्यक साहित्याचे प्रती पाच, दोन, एक किलोप्रमाणे एक-एक किट तयार करून त्या कीटचे नुकतेच कामगारांना वाटप करण्यात आले. या आधी देखील कोरोनामुळे कामगार बांधवांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून निगडी, चिंचवड व मोहननगर परिसरातील कामगार बांधवांसाठी संघटनेने जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button